Posts

आषाढी वारी आणि कोरोना

Image
मित्रांनो, वारी म्हणजे आनंदाचा सोहळा वारी म्हणजे विठ्ठल भक्तांचा लळा वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा महामेळा. अशा प्रकारे आपण वारीचे वर्णन करत असतो. वारीची परंपरा ही सुमारे सातशे वर्षांपूर्वी सुरू झाली असून, ती अद्यापही चालूच आहे. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन अभंग, भजने गात आणि विठ्ठलाचे नामस्मरण करीत करीत महाराष्ट्राच्या तसेच देशाचा कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाई च्या दर्शनासाठी  दरवर्षी येत असतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर... इ. चा पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करून पंढरपुरात येतात. असंच एकदा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मी आणि पराग, इंद्रजीत असे माझे मित्र आळंदीला आषाढी वारीसाठी गेलो होतो. तेव्हा आम्ही सुद्धा आनंदाने विठू नामाचा गजर करत आळंदीहून पुण्यापर्यंत पायी पायी आलो होतो. ते दिवस आजही आम्हाला भुरळ घालत असतात. कांदा मुळा भाजी। अवघी विठाही माझी। लसूण मिरची कोथिंबीरी। अवघा झाला माझा हरी। माटे नाडा विहीर दोरी। अवघी व्यापली पांढरी। सावता म्हणे केला माळा। विठ्ठल पायी गोविला गळा। या अभंगाचा अर्थ बारकाईने लावला तर, संत सावत...